आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......
काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ...
ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी
आणि तो मेंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...
खूप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात ....
रंगून जातो.....
आणि मग हळू हळू...
तो रंग, तो वास फिकट होत जातो
आणि त्या माणसांचे अस्तितवही दूर होते आपल्या जीवनातून..
पुन्हा परत तो कोरा हात आणि
मनात त्या रंगित, सुगन्धित, नक्षीदार आठवणी.....
तर काही माणसे असतात, त्या तळ्यात पडणा~या दगडासारखी,
शांत पाण्यात खळबळाट माजवणारी.....
ती पाण्यात पडताच तरंगवर तरंग येतात जीवनात.....
अनपेक्षित रित्या येणारी ही माणसे.....
ढवळून काढतात जीवन..
मग कधी खालचा गाळही वर येतो.........
गढूळता वर येते आपल्या जीवनातली....
आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो
आणि ही माणसे गायब होतात...
त्या तळातच खोल कुठेतरी..........
तर कधी काही माणसे असतात मृगजळासारखी ...
त्यांच्या मागे आपण धावत असतो........ ओढीने....
पण ती तर मृगजळच ना......
न हाती येणारी...
तरीही त्या तहानलेल्या जिवाला दुसरे काही दिसतच नाही..........
ते धावत असते फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की ....
हा एक भासच होता....
अशीही माणसे असतात हवेसारखी.........
सगळीकडुन व्यापलेले असतो आपण त्यानी ....
पण आपल्याला जाणीवच नसते....
.आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर .....
अगदी निस्वार्थी पणे ती असतात सतत जवळ.........
पण दिसत नाहीत दृष्टीला.......
नसतील ती....... तर जगणार कसे आपण?......
तरीही आपण विसरलेले असतो त्यानाच..........
अशीही माणसे असतात.....ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभे असतो...
जशी ही धरणी........ भुमी.....
गुरूत्वाकर्षण म्हणतात याला ......
अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेले असते आपल्याला...
न धडपडण्यासाठी... आणि न भरकटण्यासाठी ................
आधारस्तंभ........... न ढळणारा.... तो दुवा.....
जो जीवनाला आकार देतो.....
बदल्यात कधी मागतो...कधी नाही ....
पण सतत असतो..... जवळच कुठेतरी.........
माणसांच्या या व्याख्या अपुर्या आहेत...........
मी ही कदाचित या पैकी कुठल्यातरी व्याख्येत बसत असेन कोणासाठीतरी....
0 comments
Post a Comment